Amount Funded 0 500+ Life Time Donors

Donate Money

Buddha Bhumi Foundation

Be a Volunteer

Even the all-powerful Pointing has no control about the blind texts.

Be A Volunteer

भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, संत कबीर....... इत्यादी या सर्व महापुरुषांचे मानवतावादी आदर्श डोळ्यापुढे ठेवून तसेच डार्विन, स्टीफन हॉकिंग, जगदीश चंद्र बोस, आयझॅक न्यूटन....... आधी सायंटिस्ट यांनी मानव कल्याणासाठी दिलेले योगदानाचा आदर्श समोर ठेवून या भारत भूमीतील शेवटचा माणसापर्यंत सुख, शांती, समृद्धी, अन्न, पाणी, औषध, निवारा, धम्म व नैतिकतेचा शिकवण पोहोचेल या धेय्याने मुंबई उपनगरातील कल्याण शहरात ३२ एकर जागेवर चालू असलेले बुद्धभूमी फाउंडेशनचे धम्म कार्याला संपूर्ण भारतभर विस्तार करून 865 जिल्ह्यांमध्ये सर्व कार्य समावेशक असे धम्म केंद्राची निर्मिती करणे आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होईल तसे १ एकर ते १०० एकर पर्यंतची जागा विकत घेऊन खालील प्रमाणे बहु आयामी कार्यांचे समावेश करून धम्म केंद्राची निर्मिती करण्यात येईल -

१) सदर अति जबाबदारीचा मिशन चालवत असताना मल्टी लेयर सिक्युरिटी कडे पूर्ण खात्री राहील. वरील संकल्पनेतून भदंत धम्मरत्न महाथेरो, भदंत डॉ. एन आनंद महाथेरो, विपश्यनाचार्य भदंत संघकीर्ती महाथेरो, भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विश्वास्तांचे मिशन (न्यास) निर्मिती करण्यात आली आहे. सदर मिशनचे सर्वात मोठं वैशिष्ट्य असेल "ट्रान्सपरन्सी". अर्थात लोकांच्या दानातून येणारे प्रत्येक एक/एक रुपयाचा हिशोब जमा आणि खर्चच्या स्वरूपात प्रत्येक तीन महिन्यातून सर्वांसमोर ठेवण्यासाठी सामाजिक गणमाध्यमातून पोस्ट करण्यात येईल. भारतातील प्रथम ट्रान्सपरंट मिशन म्हणून इतिहासात याची नोंद राहील. ॲमेझॉन, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर , youtube, ओला, झोमॅटो, फ्लिपकार्ट इत्यादी अशा मोबाईल ॲपद्वारे वेगवेगळे क्षेत्रातील लोकं जे जिथे आहे तेथून संबंधित ग्रुप सोबत जोडले गेले आहे. याच धर्तीवर भारतातील सर्व प्रबुद्ध धम्म बांधवांना जो ज्या राज्यात-शहरात-गावात आहे त्यांना तिथून आपण जोडून घेऊया. सध्याचे काळात जगातील विविध कारभार डिजिटलाइज्ड होत चालली आहे. आपण सुद्धा या डिजिटलाइज्ड तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कोटी लोकांना जोडून घेऊन शेकडो लोकांच्या हितासाठी कार्य करूया. सदर कार्य करत असताना केंद्र सरकार व प्रांतीय सरकार यांच्या सोबत समन्वय साधून नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्यावरण, स्वच्छता, विज्ञान, अध्यात्म, शिक्षण, स्वास्थ इत्यादी मूलभूत विषयांवर मिशन कार्य करेल. "दुल्लभञ्च मनुस्सत्तम" या दुर्लभ मानवी जीवनामध्ये जास्तच जास्त लोकांपर्यंत आमची सेवा पोहोचविणे हेच आमचे सर्वात वृहत ध्येय आसेल. म्हणून भारतातील तमाम नागरिकांस जाहीर आवाहन आहे की, आपण स्वतःला १) दानदाते किंवा २) स्वयंसेवक च्या स्वरूपात स्वतःला या मिशन सोबत जोडून घ्याल आणि आपले संपर्कातील सर्वांना कळवाल.

Our Events

Be a volunteer